शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर विधानसभा संघटक, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बसस्थानकासमोर निषेध सभा करून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनात जि. प. सदस्य गुलाब पारखे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संभाजी तांबे, उपसभापती रमेश खुडे, मंगेश काकडे, अनिल खैरे, संतोष दांगट, संतोष वाजगे, पांडुशेठ गाडेकर, रशिद इनामदार, दिलीप वाजगे, रामदास बाळसराफ, रोहिदास तांबे, संतोष मोरे, इंद्रभान गायकवाड, आरीफ आतार, सुधीर खोकराळे आदी मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माऊली खंडागळे, योगेश पाटे, दिलीप डुंबरे, गुलाब पारखे, रशिद इनामदार यांनी अन्यायकारक पेट्रोल, डिझेलवाढीचा निषेध व्यक्त केला. आरीफ आतार यांनी आभार मानले.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
केंद्रसरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅस या जीवनावश्यक वस्तुंचे दरवाढ कमी करावेत या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांच्याकडे सुपूर्त करताना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे.