शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

ब्लेडने गळा कापून अज्ञात महिलेचा खून

By admin | Published: February 26, 2017 9:55 PM

उंडवडी (ता. बारामती) येथे ब्लेडच्या साहाय्याने खून के लेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे.

ऑनलाइन लोकमतबारामती, दि. 26 - उंडवडी (ता. बारामती) येथे ब्लेडच्या साहाय्याने खून के लेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचा ब्लेडने गळा कापला आहे. उंडवडी क. प. परिसरात बारामती-पाटस रस्त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची फिर्याद उंडवडी क.प.चे उपसरपंच बाळासाहेब नारायण जराड यांनी दिली आहे. शनिवारी, दि.२५ फेब्रुवारी रोजी चंद्रकांत सदाशिव जराड (रा. उंडवडी) यांना सायंकाळी ५च्या सुमारास उंडवडी गावच्या परिसरात बारामती-पाटस रोडपासून ५० मीटर अंतरावर एका महिलेचा मृतदेह आढळला. गट नं. ३८५ या शेतजमिनीतील झुडपांमध्ये अंदाजे ३० ते ३५ वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह असल्याचे त्यांनी तातडीने उउपसरपंच बाळासाहेब जराड यांना मोबाईलवर सांगितले. यानंतर जराड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या वेळी सदर अज्ञात मयत महिलेच्या मृतदेहाशेजारी ब्लेड व काचा पडलेल्या असल्याचे दिसून आले. तसेच, त्या महिलेचा गळा कापलेला दिसून आला, तसेच मानेवर ब्लेडच्या जखमा आढळून आल्या. दरम्यान, बारामती पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदर मयत महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे नाव व पत्ता अद्याप समजला नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. अज्ञात महिलेच्या खूनप्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गौड करत आहेत.दरम्यान, त्या महिलेचा गळा कापल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन करताना स्पष्ट झाले आहे, अशी महिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश भाई यांनी सांगितले.