पुणे : गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला असता, एका ८६ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर उघडकीस आली आहे. अरुणा धुरु असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरु या अविवाहित असून त्या लॉ कॉलेज रोड वरील राजभवन गल्लीमधील राहुल अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. गेले चार दिवस फ्लॅटचा दरवाजा बंद होता. वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला असता आत धुरु यांचा मृतदेह आढळला. बऱ्याच अंशी तो कुजलेला होता. पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांनपासून त्या एकट्याच राहत होत्या. शेजाऱ्यांशी त्यांचा जास्त संवाद नव्हता. मध्यंतरी त्यांची बहीण त्यांच्यासोबत राहत होती, मात्र बहिणीचे निधन झाल्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसून या घटनेची माहिती मुंबईतील त्यांच्या भावाला कळविवण्यात आली आहे. दरवाजे आतून बंद असल्याने कोणताही घातपाताची शक्यता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.
कुजलेल्या अवस्थेत सापडला ८६ वर्षीय महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 4:45 PM
गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला असता, एका ८६ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून त्या एकट्याच राहत होत्या