कोतवाल भरतीत बोगस कागदपत्रे सादर केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:25 AM2018-04-07T02:25:18+5:302018-04-07T02:25:18+5:30

बारामती तालुक्यातील मेडद येथील कोतवाल भरती प्रकरणातील आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागलेली आहेत.

 The bogus documents have been submitted in Kotwal | कोतवाल भरतीत बोगस कागदपत्रे सादर केल्याचे उघड

कोतवाल भरतीत बोगस कागदपत्रे सादर केल्याचे उघड

Next

बारामती - बारामती तालुक्यातील मेडद येथील कोतवाल भरती प्रकरणातील आणखी काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागलेली आहेत. मेडद ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी दि.२२/३/२०१८ रोजी काजल हिवरकर यांना लेखी पत्र देऊन सांगण्यात आले, की अक्षदा शैलेश नेवसे यांचे रहिवासी असल्याबाबतची आपण केलेल्या मागणीच्या कागदपत्रानुसार उपलब्ध ग्रामपंचायत कागदपत्रांची पाहणी केली असता अक्षदा शैलेश नेवसे यांची मौजे मेडद येथील रहिवासी असलेबाबतची कोणतीही नोंद ग्रामपंचायत दप्तरी आढळून आलेले नाही.
मौजे मेडद येथे अक्षदा नेवसे यांचे रेशनकार्ड जुने व नवीन तसेच मतदार यादीतील नाव व नंबर उपलब्ध नाही.
आधारकार्ड मेडद येथील साक्षांकित प्रत तसेच घरपट्टी व पाणीपट्टी यांच्या मिळकतीचा नोंदवहीचा उतारा त्याची कर भरलेली साक्षांकित प्रत उपलब्ध नाही.
युनिट रजिस्टर मेडद येथे असल्यास तसेच मेडद येथे घर असल्याबाबतचा घराचा उतारा उपलब्ध नाही, असे सरपंच
डॉ. उज्ज्वला पांडुरंग गावडे व उपसरपंच अमोल भगवान सावंत यांच्या लेटरहेडवर लेखी स्वरूपात दिलेली आहे.
वास्तविक पाहता कोतवाल पदाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे व अन्य कागदपत्रे जोडल्यानंतर खोटी किंवा विसंगत दिशाभूल माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट म्हटले आहे त्याचप्रमाणे लेखीपरीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात
येणाऱ्या उमेदवारांची मूळ कागदपत्रांची तपासणी मुलाखतीपूर्वी करण्यात येवून त्याची छाननी करण्यात येईल, असे असताना देखील या प्रकरणात कागदपत्रे बनावट असूनदेखील नेमणूक दिलीच कशी, असा प्रश्न केला जात आहे.
दरम्यान बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की, या प्रकरणी संबंधितास जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल.
मी याबाबत निर्णय घेतला असल्याकारणाने मला याबाबत काही करता येत नाही.

मेडद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, संतोष तुळशीराम गावडे यांच्या नावे असलेल्या ग्रामपंचायत मिळकतीची माहिती सदर व्यक्तिच्या नावे ग्रामपंचायतमध्ये नमुना नं. ८ ची पाहणी केली असता मिळकत आढळून आली नाही.
तसेच सदर व्यक्तिने कोणालाही भाडेकरू म्हणून घर भाड्याने दिल्याची नोंद ग्रामपंचायतमध्ये आढळून आलेली नाही तरीसुद्धा शैलेशा विजय नेवसे व संतोष तुळशीराम गावडे यांनी १०० रुपयेच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र तयार करून नेवसे हे माझ्याकडे भाडेकरू म्हणून रहात आहेत, असे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे.

Web Title:  The bogus documents have been submitted in Kotwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.