बोेरीबेलकरांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:09 AM2017-08-07T03:09:01+5:302017-08-07T03:09:17+5:30
रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दौैंड : रेल्वे फाटक नसल्याने आतापर्यंत १८ बळी गेलेल्या ठिकाणावरच आज आणखी दोघांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ ओलांडताना उद्यान एक्स्प्रेसने या दोघांना चिरडले. ही घटना रविवारी दुपारी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे घडली.
यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रेल्वे प्रशासन ग्रामस्थांच्या जिवाची हमी घेत नाही तोपर्यंत रूळावरील मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस रोखून धरली.
सुरेश सूर्यवंशी (वय ६५), कार्तिक खळदकर (वय ३, दोघेही रा. बोरीबेल, दौंड) या दोघांचा यात मृत्यू झाला. हे दोघे रेल्वे रूळ ओलांडून गावात येत होते. भरधाव वेगाने मुंबईकडे धावणाºया उद्यान एक्स्प्रेसने चिरडले.
ही घटना समजताच ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत रेल्वे प्रशासन रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल उभारण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. इंद्रायणी एक्स्प्रेस यामुळे सुमारे एक तास थांबून राहिली.
काही वेळानंतर घटनास्थळी रेल्वेचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवासिंज बाविस्कर, रेल्वे सुरक्षा बलाचे सातपुते आले. त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. परिणामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने उद्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो मार्ग काढू, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे बोरीबेल गावावर शोककळा पसरली आहे.
रेल्वे दुर्घटनेचा २0वा बळी
बोरीबेल रेल्वे स्थानक परिसरात ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे फाटक नाही. गाव दोन विभागांत विस्तारीत झाले असल्याने गावात ये-जा करण्यासाठी नाईलाजास्तव रूळ ओलांडावे लागतात. गेल्या १0 वर्षांत १८ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या ३0 वर्षांपासून खासदार, आमदार, रेल्वे प्रशासनाकडे ग्रामस्थ सुरक्षेची मागणी करीत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. जर ३0 दिवसांत प्रशासनाने उपाययोजना केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
- हनुमंत पाचपुते, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ