ब्राईट ११ के, चॅम्पियन्स इलेव्हन संघांची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:21+5:302021-03-27T04:11:21+5:30

पुणे : कर्मा ९ स्पोर्ट्स यांच्यातर्फे व रेडबुल यांच्या सहकार्याने आयोजित कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ...

Bright 11K, Champions XI lead | ब्राईट ११ के, चॅम्पियन्स इलेव्हन संघांची आगेकूच

ब्राईट ११ के, चॅम्पियन्स इलेव्हन संघांची आगेकूच

Next

पुणे : कर्मा ९ स्पोर्ट्स यांच्यातर्फे व रेडबुल यांच्या सहकार्याने आयोजित कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ब्राईट ११ के व चॅम्पियन्स इलेव्हन या संघांनी अनुक्रमे टायटन्स व ए अँड आय डायजेस्ट या संघांचा पराभव करून आगेकूच केली.

लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे आठवड्याच्या शेवटी दर शनिवार व रविवार या दिवशी सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात क गटात अथर्व वाघ(नाबाद ३७ धावा, 1-10) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ब्राईट ११ के संघाने टायटन्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात अ गटात दत राऊत्रे याने केलेल्या उपयुक्त ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर चॅम्पियन्स इलेव्हन संघाने ए अँड डायजेस्ट संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी :

क गट : टायटन्स : २० षटकांत ८ बाद १०६ धावा. सागर फडतरे २४, विनीत समतानी १९, ऋशु बवेजा १७, अमित मदानी १४. गोलंदाजी - ऋषिकेश टेम्बे ३-१२, अथर्व वाघ १-१०, विनोद परमार १-१३ पराभूत वि. ब्राईट ११ के : १७ षटकांत ३ बाद १०७ धावा. अथर्व वाघ नाबाद ३७, केतन बापट नाबाद २५, सिद्धार्थ जोशी १८. गोलंदाजी - विकास श्रीवास्तवा १-८, विजय धर्मानी १-२२; सामनावीर-अथर्व वाघ; ब्राईट ११ के संघ ७ गडी राखून विजयी;

अ गट : ए अँड आय डायजेस्ट : २० षटकांत ६ बाद ११० धावा. अमित पाटील नाबाद ४८, मंगेश हांडे ३४. गोलंदाजी - नितीन बोरकर १-५, सौरभ शर्मा १-२३, अब्दुल खान १-१८. पराभूत वि. चॅम्पियन्स इलेव्हन : १२.३ षटकात २ बाद १११ धावा. दत राऊत्रे ४२, कनिष्क सिंग नाबाद १७. गोलंदाजी - अमित पाटील १-१०; सामनावीर-दत राऊत्रे; चॅम्पियन्स इलेव्हन संघ ८ गडी राखून विजयी.

फोटो - अथर्व वाघ

Web Title: Bright 11K, Champions XI lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.