आजारी बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:58 PM2019-05-03T16:58:24+5:302019-05-03T17:01:19+5:30
घोडेगाव जवळील घोडनदीवर बांधण्यात आलेल्या गोनवडी बंधा-यामध्ये भीमाशंकर अरूण उपासे (वय २५) रा. देगाव, जि. सोलापुर हा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. याबाबत संजय आर्वीकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पुणे : घोडेगाव जवळील घोडनदीवर बांधण्यात आलेल्या गोनवडी बंधा-यामध्ये भीमाशंकर अरूण उपासे (वय २५) रा. देगाव, जि. सोलापुर हा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. याबाबत संजय आर्वीकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
भीमाशंकर उपासे दोन दिवसांपुर्वी घोडेगाव येथे त्यांची बहिण डाॅ.प्रियांका आर्विकर आजारी असल्याने तीला भेटण्यास आला होता. दि. ३ मे रोजी सकाळी ७ वा. भीमाशंकर उपासे व ऍड .संजय आर्विकर घोडेगाव जवळील गोनवडी येथे घोडनदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यामध्ये पोहण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे इतर लोक पोहण्यासाठी होते. भीमाशंकर यांस पोहता येत नसल्याने तो बंधा-याचे काठावर बसला. अन् आर्विकर पोहण्यास निघुन गेले.
भीमाशंकर उपासे काढावर बसले असता अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्यावेळी तेथे पोहणारे इतर व्यक्ति व आर्विकर यांनी त्यास तात्काळ बाहेर काढले. तेथे पोहण्यासाठी येणा-या डॉक्टरांनी त्यांच्या पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बेशु्ध्द असल्याने त्यास रूग्णवाहीके मधुन घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता मृत असल्याचे सांगितले. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप लांडे करत आहे.