पुणे : उपनगरातील प्रवाशांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली. शहरातील विविध मार्गांवर ही सेवा सुरु करण्यात अाली. सुरुवातीपासूनच यामध्ये अनेक त्रृटी असल्याचे समाेर अाले हाेते. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्या सुधारण्याचा फारसा प्रयत्न हाेत नसल्याचे चित्र अाहे. गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये बीअारटी बसेसचे एकूण 18 अपघात झाले असून या अपघातांमध्ये 3 जणांना अापले प्राण गमवावे लागले अाहेत.
बीअारटी मार्गातील अडचणींची मालिका संपता संपत नसल्याचे चित्र अाहे. खासकरुन संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड वरील मार्गांमध्ये अनेक त्रृटी अद्याप राहिल्या अाहेत. बीअारटी मार्गातील सर्वात माेठी अडचण ही या मार्गांमध्ये हाेणारी खासगी वाहनांच्या घुसखाेरीची अाहे. दरराेज अनेक खासगी वाहने या बीअारटी मार्गांमध्ये घुसखाेरी करतात. ही वाहने तसेच बस वेगात असल्याने अनेक प्राणांतिक अपघात या मार्गात घडले अाहेत. ही घुसखाेरी राेखण्यासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात अाली हाेती. परंतु त्यांचे सुद्धा वाहनचालक एैकत नसल्याचे चित्र अाहे. त्यानंतर पीएमपी कडून हे मार्ग सुरु हाेतात तेथे रस्सी लावण्याचा प्रयत्न केला. याने थाेडा फरक पडला असला तरी अनेक वाहनचालक दमदाटी करुन वाॅर्डनला ही रस्सी खाली घेण्यास भाग पाडतात. तसेच रात्रीच्या वेळी हा मार्ग माेकळाच असताे. त्यामुळे खासगी वाहने बेधडकपणे या मार्गातून जात असतात. संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गात काही भागातील वळणे ही अपघाताला निमंत्रण देणारी अाहेत. त्यात कुठलिही सुधारणा करण्यात अाली नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासन या मार्गांकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे चित्र अाहे.
पीएपीकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात बीअारटी मार्गांमध्ये पीएमपी बसचे 18 अपघात झाले अाहेत. त्यात 3 लाेकांना अापला प्राण गमवावा लागला अाहे तर दाेन जण गंभीर जखमी झाले अाहेत. 13 किरकाेळ अपघात झाले अाहेत. पीएमपी बसेस व्यतिरिक्त खासगी वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातांची संख्याही अधिक अाहे. त्यामुळे हा बीअारटी मार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग ठरत अाहे. याबाबत बाेलताना पीएपपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, उपनगरातील नागरिकांना जलद बससेवा मिळावी यासाठी बीअारटी सुरु करण्यात अाली. परंतु बीअारटी मार्ग सुरु करताना ज्या प्राथमिक गाेष्टींची पुर्तता करणे अावश्यक अाहे त्या केल्या गेल्याच नाहीत. फक्त बीअारटी बसेससाठीच हा डिडीकेटेड काॅरिडाॅर असणे अावश्यक हाेते, परंतु तसे ते दिसत नाही. त्यामुळे जलद वाहतूकीचे जे पीएमपीचे उद्दीष्ट हाेते तेच फाेल ठरले अाहे. प्रशासनाकडून या मार्गांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचा परिणाम या अपघातांमधून दिसून येत अाहे. या मार्गांमध्ये सुधारणा करण्याची प्रशासनाची इच्छा शक्ती नाही. यात सामन्य नागरिकांचा हाकनाक जीव जात अाहे.