इंदापूर : सन २०१८- १९ चा १ लाख १५ हजार ३६६ रुपये शिलकीचा इंदापूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती देताना नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले की, ९३ कोटी २९ लाख ७२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम जमा बाजूस दाखवण्यात आली आहे. तर ९३ कोटी २८ लाख ७२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम खर्चाच्या बाजूस दाखविण्यात आली आहे.ते पुढे म्हणाले की, मालमत्ता करापोटी ४ कोटी ८१ लाख २६ हजार रुपये, १ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपये पाणीपट्टी कराद्वारे, मुद्रांक शुल्कातून १२ लाख रुपये, सहायक अनुदानातून ४ कोटी ५३ लाख रुपये, करमणूक कर, गौण खनिज, जमीन महसुलातून १३ लाख रुपये, बाजार भाडे १० लाख रुपये, गाळे भाडे २५ लाख रुपये, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ६ कोटी रुपये, अल्पसंख्याक योजनेतून २० लाख रुपये, नगरोत्थान योजनेतून ५ कोटी रुपये, भुयारी गटार योजनेतून १५ कोटी रुपये, रस्ते अनुदान योजनेतून ७ कोटी रुपये, सुजल निर्मल योजनेतून ७ कोटी रुपये, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजनेतून २ कोटी रुपये, रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतून ५ कोटी रुपये, युडी सहा योजनेतून १० कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगर परिषदेच्या नियोजित इमारतीसाठी ५ कोटी रुपये, लोकवर्गणीसाठी ९० लाख रुपये, शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ३ कोटी रुपये, नागरी दलितेतर योजनेतून १ कोटी रुपये, स्थानिक विकास फंडातून १ कोटी ५० लाख रुपये असा जमा निधीची वर्गवारी आहे. अग्निशामक वाहन खरेदीसाठी ५० लाख रुपयांचा निधी जमा दाखवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.मंडई व आठवडा बाजार वसुली, पार्किंगच्या जागेच्या वसुलीसाठी लिलाव करण्यास, भिंतीवरील जाहिराती, डिजिटल व आॅडिओ जाहिराती, शौचालयांच्या भिंतीसह, खांबांवरील जाहिरातींची कर आकारणी करण्यास अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.>्रविविध योजनांसाठी निधीचौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीजबिल भरण्यासाठी २ कोटी ३० लाख रुपये खर्ची दाखवण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी २ कोटी ५० लाख रुपये, लोकवर्गणीसाठी १ कोटी २० लाख रुपये, अल्पसंख्याक योजनेतून २० लाख रुपये खर्ची दाखवण्यात आले आहे, असे सांगून अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले कीं, नगरोत्थान योजनेतून ५ कोटी रुपये, भुयारी गटार योजनेतून १५ कोटी रुपये, रस्ते अनुदान योजनेतून ७ कोटी रुपये, सुजल निर्मल योजनेतून ७ कोटी रुपये. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी सुधार योजनेतून २ कोटी रुपये, रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतून ५ कोटी रुपये, युडी सहा योजनेतून १० कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगर परिषदेच्या नियोजित इमारतीसाठी ५ कोटी रुपये, लोकवर्गणीसाठी ९० लाख रुपये, शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ३ कोटी रुपये, नागरी दलितेतर योजनेतून १ कोटी रुपये, स्थानिक विकास फंडातून १ कोटी ५० लाख रुपये, अग्निशामक वाहन खरेदीसाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे. महिला व बालविकास कल्याण विभागासाठी ६ लाख रुपये, दुर्बल घटक फंडासाठी ६ लाख रुपये, दिव्यांगांसाठी ३ लाख ६० हजार रुपये, क्रीडा विकासासाठी १ लाख २० हजार खर्च दाखविण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर, जाहिरातींची कर आकारणी करण्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:29 AM