बांधकाम व्यावसायिकांनी रिंगरोड परिसरात लक्ष द्यावे: किरण गित्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:02 PM2018-03-06T17:02:33+5:302018-03-06T17:02:33+5:30
पुणे: शहरा भोवती होत असलेल्या रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करून या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी क्रेडाईच्या सभासदांना केले.रिंगरोड आणि त्यापर्श्वभूमीवर होणारा शहराचा विकास या विषयावर क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभासदांसमोर किरण गित्ते यांनी सादरीकरण केले.
पुणे: शहरा भोवती होत असलेल्या रिंगरोड परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित करून या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी क्रेडाईच्या सभासदांना केले.
रिंगरोड आणि त्यापर्श्वभूमीवर होणारा शहराचा विकास या विषयावर क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभासदांसमोर किरण गित्ते यांनी सादरीकरण केले. या प्रसंगी गित्ते बोलत होते.क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, किशोर पाटे व अनिल फरांदे , नॅशनल क्रेडाई युथ विंगचे समन्वयक आदित्य जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
गित्ते म्हणाले की, शहराच्या वाहतूककोंडीवर व जिल्ह्याच्या विकासासाठी रिंगरोड हा महत्त्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम हे लवकरच सुरू होणार आहे. पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीचा रिंगरोड १२८ कि.मी. लांब व ११० मीटर रुंद असा रिंगरोड असणार आहे. तसेच टाउन प्लॅनिंग स्कीम मधून रिंग रोड परिसरातील प्लॅन्ड डेव्हल्पमेंट सुध्दा होणार आहे. त्यातून पुण्याचा विकास होण्यास मदत होणार आहे. सहा टप्प्यांमध्ये रिंगरोड प्रकल्पाचे काम केले जाणार असून त्यातील पहिले दोन टप्प्यांचे काम पुढील काही महिन्यात सुरु होतील. रिंगरोड लगत असलेल्या परिसरात टाउन प्लॅनिंग स्कीम्स नियोजित केल्या आहेत. त्यात पीएमआरडीएच्या वतीने रस्ते, पाणी आणि इतर आवश्यक सोयी- सुविधा पुरविल्या जाणार आहेत.त्यामुळे बांधकाम क्षेत्र व नागरिकांना हे नक्कीच सोयीचे ठरणार आहे.