बांधकाम विकासकांनी संयम बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:11 AM2020-12-02T04:11:32+5:302020-12-02T04:11:32+5:30
................................ विधाता डेव्हलपर्सचे संचालक मंगेश गावडे यांचा आत्मविश्वास ...................................... पुणे: कोरोना महामारीचा फटका संपुर्ण जगालाच बसला आहे. त्यामुळे ...
................................
विधाता डेव्हलपर्सचे संचालक मंगेश गावडे यांचा आत्मविश्वास
......................................
पुणे: कोरोना महामारीचा फटका संपुर्ण जगालाच बसला आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. याही परिस्थितीत बांधकाम तसेच विकासकाचा व्यवसाय उभारी घेईल, असे प्रतिपादन विधाता डेव्हलपरचे संचालक मंगेश गावडे यांनी ʻलोकमतʼबरोबर बोलताना केले.
या व्यवसायाचा आढावा घेतांना ते म्हणाले, कोरोना महामारीने जगात थैमान घातलं असून आता तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या चिंताजनक परिस्थितीचा सर्वच क्षेत्रांवर अतिशय गंभीर आणि प्रतिकूल परिणाम झाला आहे,या महामारीच्या प्रसारामुळे संपूर्ण जगातील मानव समूहाला जीवंत राहणे हीच प्राथमिकता आहे. गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांनाच याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लोकांच्या रोजच्या व्यवहारातले प्राधान्यक्रमच बदलले आहेत आणि त्याचा परिणाम खरेदी विक्री सारख्या व्यवसायावर सुद्धा झाला आहे. अर्थकारण ही साखळी आहे,आर्थिक व्यवहार किंवा कोणताही व्यवसाय हे एकमेकांवर अवलंबून असतात कोरोना महामारी व लॉकडाऊन अनेकांचे रोजगार गेले आणि अनेकांना घरातच बसावं लागलं. परिणामी, अर्थकारणाची साखळी तुटली,याचा सगळ्यांना जसा तोटा झाला,तसाच तो प्लॉटिंगव्यवसायिकांनाही झाला. लॉकडाऊनच्या काळात खरेदी विक्री व्यवहार बंद पडले, त्यामुळे प्लॉटींग व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले,कारण एकीकडे प्लॉटमध्ये गुंतवलेली मोठी रक्कम अडकून पडली.तर दुसरीकडे खरेदी विक्रीच बंद झाली. लॉकडाऊनमुळे ग्राहक येत नसल्याने हा व्यवसाय पूर्णपणे थंडावला. काही व्यावसायिक सामान्य ग्राहकांना हप्त्यांची सोय देत होते. त्यातून या व्यावसायिकांना आधीच्या काही हप्त्यातून काही रक्कम मिळायची पण लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना हप्त्यासाठी किंवा वसुलीसाठी तगादा लावू नये ,या सरकारी आव्हानामुळे प्लॉटींग व्यावसायिक तिहेरी कात्रीत सापडला आहे.
आता अनलॉक झालं असलं तरी सर्व काही सुरळीत व्हायला आणि प्लॉटींग व्यावसायिकांना पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल. मात्र, या व्यावसायिकांनी निराश कारण नाही,कारण असे चढउतार सर्वच क्षेत्रात येतात,आता तर कोरोना संकट जागतिक आहे.त्यामुळे आपण सगळेच यातून लवकरात लवकर बाहेर पडू, याची मला पूर्ण खात्री आहे.