बंडगार्डन पुलाचे कठडे काेसळण्याच्या स्थितीत ; डागडूजीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 05:15 PM2018-07-05T17:15:03+5:302018-07-05T17:19:14+5:30

पुण्यातील बंडगार्डन पुलाचे कठडे माेडकळीस अाले असून कुठल्याही क्षणी ते काेसळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या पुलाची डागडूजी करण्याची मागणी अाता नागरिक करीत अाहेत.

bungardan bidge need structural audit | बंडगार्डन पुलाचे कठडे काेसळण्याच्या स्थितीत ; डागडूजीची गरज

बंडगार्डन पुलाचे कठडे काेसळण्याच्या स्थितीत ; डागडूजीची गरज

पुणे : अंधेरी येथील पादचारी पूल काेसळून त्यात अनेकजण जखमी झाले. पुलाची डागडूजी याेग्यवेळी करण्यात न अाल्याने माेठी दुर्घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा डागडूजीस अालेल्या पुलांचा प्रश्न एैरणीवर अाला अाहे. पुण्यातील महत्त्वाचा असणारा बंडगार्डन पूलाची अवस्था बिकट झाली असून पादचारी मार्गावरील कठले कुठल्याही वेळी काेसळण्याच्या स्थितीत अाहेत. त्यामुळे अंधेरी सारखी घटना घडल्यावर पालिका प्रशासन पुलाची डागडूजी करणार का असा प्रश्न अाता नागरिक विचारत अाहेत. 

    पुणे शहरातील महत्त्वाचा असा हा येरवडा भागातील बंडगार्डन पुल अाहे. अहमदनगर तसेच लाेहगाव, विमाननगर, खराडी या भागातून येणारी नागरिकांना पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागताे. त्याचबराेबर खडकी, विश्रांतवाडीकडून अालेली वाहने सुद्धा याच पुलावरुन जातात. त्यामुळे माेठ्याप्रमाणावर वाहतूक या पुलावरुन दिवसरात्र सुरु असते. या पुलाशेजारील ब्रिटीशकालीन पूल जीर्ण झाल्याने ताे वाहतूकीस बंद करण्यात अाला. त्यानंतर याच पुलावरुन संपूर्ण वाहतूक सुरु अाहे. सध्या या पुलाच्या पादचारी मार्गाच्या कठड्यांना तडे गेले असून बांधकामातील सळ्या दृष्टीस पडत अाहेत. साध्या धक्क्याने या पुलाच्या कठड्यातून सिमेंट पडत अाहे. त्याचबराेबर एखादे माेठे वाहन या पुलावरुन गेल्यास कंपने जाणवत अाहेत. पादचाऱ्यांच्या पुलावरही काही ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र अाहे. पुलाच्या दाेन्ही बाजूस सारखेच चित्र पाहावयास मिळत अाहे. एखाद्या भरधाव वाहनाची धडक कठड्यांना बसल्यास वाहन थेट नदीत पडण्याची शक्यता अाहे. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल अाॅडिट करुन या पुलाची डागडूजी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे. 


    याबाबत बाेलताना येथील रहिवासी अाणि सामाजिक कार्यकर्ते मनाेज शेट्टी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूल पडल्याचा बातम्या समाेर येत अाहेत. पुलांची नियमित डागडूजी करणे अावश्यक अाहे. बंडगार्डनचा पूल बांधून अवघे 25 ते 30 वर्ष झाली अाहेत. त्या अर्थाने फार जूना असा हा पूल नाही. तरीही या पुलाचे संरक्षक कठडे माेडकळीस अाले अाहेत. केवळ हाताने जरी धक्का दिला तरी त्यातून सिमेंट बाहेर पडत अाहे. पूलावरुन माेठे वाहन गेल्यास कंपने सुद्धा निर्माण हाेतात. हा पूल शहरातील अनेक महत्त्वांच्या ठिकाणांना जाेडणारा असल्याने यावरुन माेठी वाहतूक दरराेज हाेत असते. या पुलाची सद्यस्थिती पाहता येत्या काही वर्षात माेठा अपघात या ठिकाणी हाेऊ शकताे. या पुलाची डागडूजी करण्यासंदर्भात मी पालकमंत्री व महापालिकेच्या अायुक्तांशी लवकरच पत्रव्यवहार करणार अाहे. 

Web Title: bungardan bidge need structural audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.