आयसीएआयतर्फे जुलै २०२१ मध्ये सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षा घेण्यात आली. नवीन योजनेनुसार सीएची अंतिम परीक्षेतंर्गत ग्रुप-एकची परीक्षा ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी दिली असून, त्यातील ९ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ग्रुप-दोनची परीक्षा एकूण ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील ७ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३ हजार ९८१ इतकी असून, त्यातील दोन हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
देशातील ७१ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी फाउंडेशन परीक्षा दिली. त्यातील १९ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा एकूण निकाल २६.६२ टक्के लागला आहे. त्यात मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी २६.०८ तर मुलींची टक्केवारी २७.२६ इतकी आहे. दरम्यान, आयसीएआयच्या पुणे विभागाने पुण्यातील ‘टॉपर’ विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार रोनक तुलशन याने प्रथम क्रमांक, मृण्मयी अवचटने हिने द्वितीय, मनाली पावळे हिने तृतीय, शंतनू दरक याने चौथा, तर अक्षय दर्डा याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.