हडपसरमध्ये फुटू शकतो कालवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 01:55 AM2018-09-30T01:55:23+5:302018-09-30T01:55:50+5:30

पाणीमाफिया : कालव्याची भगदाडे पथ्यावर, दिवसाढवळ््या हजारो लिटर पाण्याची चोरी

Canal sprays in Hadapsar also, pune canal | हडपसरमध्ये फुटू शकतो कालवा

हडपसरमध्ये फुटू शकतो कालवा

Next

हडपसर : दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने गुरुवारी जी परिस्थिती निर्माण झाली, ती परिस्थिती हडपसर व फुरसुंगी परिसरातही होऊ शकते. कारण येथील कालव्याचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामळे नवीन मुळा-मुठा कालव्यावरील पुलांना शहर व उपनगरांमध्ये दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी भगदाडे पडून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन दररोज लाखो लिटर पाणी अहोरात्र वाहून जात आहे. तसेच कालव्याच्या भरावाचीदेखील जागोजागी प्रचंड दुरवस्था होऊन पाणीगळती व पाणीचोरीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

शहरातून वाहणाऱ्या या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पुणे शहर व उपनगरांतून फुरसुंगी, लोणीकाळभोर, यवत आदी परिसरातून जात असल्याने या भागातील लाखो नागरिकांना पिण्यासाठी व लाखो हेक्टर शेतीसाठी हा कालवा महत्त्वपूर्ण आहे. अशा वेळी कालव्याच्या भरावाची व पुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या कालव्यातून बारमाही दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असल्याने दरवर्षी शेतकºयांना ऐनउन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, तर ग्रामीण भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

अतिक्रमणे, राडारोडा आणि पाणीचोरी

कालव्याच्या भरावावर जागोजागी पाटबंधारे कर्मचारी व अधिकाºयांच्या अर्थपूर्ण वरदहस्ताने बेकायदा राडारोडा टाकून भलामोठा मातीचा डोंगरच तयार केल्यामळे कालव्याची खोली दिवसेंदिवस कमी होत असून कालवा बुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कालव्याच्याकडेला शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या व अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे घाण पाणी व सांडपाणी थेट कालव्यात जात असल्याने पाणी प्रदूषित होत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामळे पाटबंधारे विभागाने कालव्यावरील पूल व भरावांची तत्काळ दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी व पाणीचोरी करणाºयांवर आणि त्यांना मदत करणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Canal sprays in Hadapsar also, pune canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.