बहिणीची सरपंचपदी निवड होताच भावाकडून मोटार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:05+5:302021-02-10T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाघोली : हवेली तालुक्यातील अष्टापूर गावच्या सरपंचपदी कविता जगताप यांची, तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : हवेली तालुक्यातील अष्टापूर गावच्या सरपंचपदी कविता जगताप यांची, तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीतील वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे कविता जगताप यांचे बंधू रामकृष्ण सातव पाटील यांनी आपली बहीण सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना इनोव्हा भेट देत बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला.
अष्टापूर ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. यावेळी सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक चव्हाण यांनी सरपंचपदी कविता जगताप यांची तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे यांनी सहाय्य केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा फुलांचे गुच्छ व सन्मानित केला. यावेळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सहभागातून वैशिष्टयपूर्ण कामे करणार असल्याचे सरपंच कविता जगताप तसेच उपसरपंच विकास कोतवाल यांनी सांगितले.
.........
भाऊ-बहिणीच्या नात्याचा आदर्श....
सध्या शहरालगत वाढते औद्योगीकरण आणि जमिनीच्या वाढत्या बाजारभावामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा येत असताना अष्टापूर गावात मात्र बहीण सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर भावाने त्यांना मोटार भेट देत भाऊ - बहिणीच्या नात्याचा आदर्श जगासमोर घालून दिला आहे. हाच आदर्श राज्यातील बहीण-भावाने घ्यावा, असे यावेळी रामकृष्ण सातव पाटील यांनी बोलताना म्हटले.
फोटो: