सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:26 PM2019-12-16T19:26:50+5:302019-12-16T19:34:09+5:30
शहरातील शाळकरी मुले व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण
- माऊली शिंदे
कल्याणीनगर : शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले आहे. गुटखा, दारू, सिगारेट, एलएसडी, फेवीबॉड, गांजा, एमडी यांच्या व्यसनांमध्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. १३ ते १६ वयोगटातील सर्वात जास्त मुले व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेत आहे. समुपदेशांकडे दररोज सरासरी तीन शाळकरी मुले व्यसन सोडवण्यासाठी उपचार घेत असल्याचे धक्कादायक चित्र शहरामध्ये आहे.
सिनेमातील नायक स्टाईलमध्ये सिगारेट ओढतो, मित्र सांगतो जबरदस्त थ्रिल असतं आणि कुल वाटते, व्यसन केल्यावर किक बसते.. व्यसनामुळे अभ्यास चांगला होतो. यांसारख्या एकापेक्षा एक व्यसन करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या कमेंट्समुळे शालेय विद्या्नर्थ्यांच्या मनामध्ये व्यसनांविषयीचे कुतुहल वाढते.तसेच व्यसन न केल्यावर मित्रांमध्ये आपण एकटे पडू या भीतीने व अशा विविध कारणांमुळे शाळकरी मुले व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. सुरुवात सिगारेट, हुक्कापासून करणारा विद्यार्थी हळूहळू एलएसडी आणि गांज्याच्या आहारी जातो. अनेक शाळांमध्ये व्यसनी मुलांची गँग तयार झाली आहे. व्यसन करणा-यासाठी लागणा-या पैश्यासाठी मुले गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. शहरातील प्रत्येक परिसरामध्ये तीस ते चाळीस पेक्षा जास्त शाळकरी मुले व्यसनी आहेत. हे प्रमाण गेल्या काही वषार्पासून वाढत आहे. बदलती जीवनशैली पालकांना कामामुळे मुलांना वेळ देता येत नाही. मुलांनी मागितल्यानंतर तत्काळ पैसै दिले जातात. पालक आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे. यामुळे मुले घरापेक्षा बाहेर जास्त राहत आहे. व्यसनामुळे अनेकांना शाळेतून काढण्यात आले आहे.
याबाबत आनंद व्यसन मुक्ती केंद्राचे डॉ अजय दुधाने यांनी सांगितले की, पालकांचा आणि मुलांचा सुसंवाद गरजेचा आहे. व्यसनाच्या परिणामांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती केली पाहिजे. व्यसन मुक्ती ही चळवळ झाली पाहिजे. शासनाच्या अमंली पदार्थ विकेत्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
- व्यसनामुळे मुलांमध्ये भ्रम हा गंभीर मानसिक आजार होतो. व्यसनामुळे मानसिक आणि शाररीक आजार होतात. दर दिवशी कमीत कमी तीन मुले व्यसन सोडवण्यासाठी समुपदेशकसाठी येतात. मुले आणि पालकासाठी व्यसन मुक्तीबाबत वांरवार कार्यशाळा घेणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ प्रविण पारगावकर यांनी व्यक्त केले.
......................
शहरामध्ये गांजा,एलएसडी, एमडी सहज उपलब्ध होत आहे
शाळकरी मुलांना शहरामध्ये गुटखा, गांजा,एलएसडी, एमडी सारखे व्यवसानाधिक पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. यामुळे मुले व्यसनाधीन होत आहे. अंमली पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी, शाळेतील मुलांना हे पदार्थ सहज मिळतात.
मी सहावीत असल्यापासून व्यसन करत आहे. गांजा, एलएसडी(स्टॅम्प), फेवीबॉड चे व्यसन करतो. त्यांनतर हेडफोनवर ट्रान्स म्युझिक (विज खलिफा, एनरिके, मशिनगन केली, स्नूग डॉग, पोस्ट मॅलॉन) लावून शहरामध्ये फिरायचो. घरातील एका कोप-यात बसायचो. आमच्या शाळेतील तीस व्यसनी मुलांचा ग्रुप आहे. सगळे एलएसडी आणि गांजा घेतात. शहरातील सहज गांजा आणि एलएसडीच मिळते. या विक्रेत्यांना गणपती, पॉकेमॉन, शिमला, पुडी असे कोडवर्डे बोलल्यावर ते लगेच देताता. मी अमंली पदार्थ विक्रीचा व्यवसाय केला आहे. मी पॅडलिग( एजंट) करायचो. व्यसनाच्या नादात गुन्हे घडले आहेत. व्यसनामुळे शाळा सुटली आहे. खुप भांडणे केली आहे. आता हे सगळे सोडायचे आहे अशी माहिती तेरा वर्षाच्या मुलांनी दिली.