पुणे : पोस्को कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्हयात तक्रारदार व त्यांच्या आईला साक्षीदार करण्याकरिता लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर येरवडा पोलीस स्टेशन येथे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
प्रशांत कोंडीराम किवे ( पोलीस उपनिरीक्षक, लक्ष्मीनगर पोलीस चौकी, येरवडा पोलीस स्टेशन) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. येरवडा पोलीस स्टेशन येथे पोस्को कायदयान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामधील तक्रारदार आणि त्यांच्या आईला आरोपी करू शकतो असे सांगत आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी पोलीस उपनिरीक्षकाने केली. तडजोडीनंतर ३५ हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. त्यानुसार लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटच्या सहायक पोलीस आयुक्त विजयमाला पवार गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.
.....