मेदनकरवाडीत पिस्तुलाचा धाक दाखवून रोख रक्कम लुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 08:51 PM2019-07-21T20:51:31+5:302019-07-21T20:53:54+5:30
चाकण येथील शिक्रापूर रस्त्यावरील मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल शिवराज मध्ये चार जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या टेबल, खुर्च्या, फ्रिज व टीव्ही ची तोडफोड करून पिस्तुलाचा धाक दाखवून काउंटर मधील ९८६० रुपयांची रक्कम लुटून नेली.
चाकण : येथील शिक्रापूर रस्त्यावरील मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल शिवराज मध्ये चार जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या टेबल, खुर्च्या, फ्रिज व टीव्ही ची तोडफोड करून पिस्तुलाचा धाक दाखवून काउंटर मधील ९८६० रुपयांची रक्कम लुटून नेली. हॉटेल मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस चाकण पोलिसांनीअटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तूल व दोन जीवनात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हो घटना शनिवारी ( दि. २० ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. हॉटेल मालक काळुराम आनंदा खांडेभराड ( वय ४४, रा. कडाचीवाडी, ता.खेड, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमोल माउली लष्करे, अमोल विनायक ओव्हाळ, संतोष ननावरे व एक अनोळखी इसम असा चार जणांवर भादंवि कलम ३९२, ४२७, १४, आर्म ऍक्ट ३ ( २५ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदू गणपत शिंदे ( वय ३२, रा. मोशी, ता. हवेली, जि.पुणे ) यास अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विक्रम पासलकर हे पुढील तपास करीत आहेत.