नगरसेविका आरती कोंढरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:15 AM2021-09-05T04:15:12+5:302021-09-05T04:15:12+5:30
पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ ब मधील विद्यमान नगरसेविका आरती कोंढरे-देशमुख यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले ...
पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ ब मधील विद्यमान नगरसेविका आरती कोंढरे-देशमुख यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे.
नगरसेविका कोंढरे यांच्यावर त्यांचे जातीचे प्रमाणपत्र वैध नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यातून हे प्रकरण २०१७ साली जात पडताळणी समितीकडे गेले होते. समितीने सर्व निकष व पुरावे तपासून नगरसेविका आरती कोंढरे यांचे जात पडताळणी केली, त्यात त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले होते.
दरम्यान या वैधतेला आव्हान देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा उच्च न्यायालयातून या प्रकरणाची चौकशी केली व बुलढाणा जात पडताळणी समितीला विविध पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये सर्व पुरावे तपासल्यावर आरती कोंढरे यांचे जातप्रमाणपत्र वैद्य ठरविण्यात आल्याचा निर्णय देण्यात आला. नगरसेविका कोंढरे यांच्या वतीने अँड. राम कारोडे, अँड. नारनवरे यांनी बाजू मांडली.