--
चाकण : लोकमत आयोजित रक्ताचं नातं या उपक्रमास चाकण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकमत, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान आणि शिवसेना खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या रक्तदान शिबिरात १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माऊली कटके, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, नितीन गोरे, जि. प. सदस्य बाबाजी काळे, किरण मांजरे, सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, संजय घनवट, ज्योती अरगडे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, प्रकाश वाडेकर, चंद्रकांत मांडेकर, शरद भोसले, विजय मुऱ्हे उपस्थित होते.
रक्तदात्यांना आयोजिकांकडून प्रमाणपत्र आणि संजय पुरी यांच्याकडून एक वृक्ष भेट देण्यात आले. शिबिराला नवनाथ शेवकरी, माणिक गोरे, विकास गोरे, राहुल गोरे, नितीन गोरे, उमेश गोरे, निलेश गोरे, ओमकार गोरे, लक्ष्मण जाधव, सोमनाथ मुंगसे, नरेंद्र वाळुंज, विजया शिंदे, राजेंद्र गोरे, स्नेहा जगताप, प्रकाश गोरे, महेश शेवकरी, राजेंद्र खेडकर, निलेश गोरे, विशाल नायकवाडी, पांडुरंग बनकर, किरण गवारी, बापूसाहेब थिटे, चंदन म्हुरे, धनंजय पठारे, विशाल पोतले, गोरक्षनाथ कांडगे, काळुराम बनकर, चेतन बर्गे, श्रीनाथ लांडे, मंगेश कांडगे, विजया जाधव, गणेश नाणेकर, राहुल मेदनकर, कविता करपे, सुरेश पानसरे, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, शाम राक्षे, ऋषिकेश वाव्हळ, स्वप्नील बिरदवडे आदींनी शिबिराला भेटी देऊन काहींनी रक्तदानही केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, नारायण करपे, अतुल सवाखंडे,चंद्रकांत बुट्टे, प्रमोद पारधी, रत्नेश शेवकरी, संजय पुरी, योगेश गोरे, अतुल गोरे, विशाल बारवकर, योगेश शेवकरी, गिरीश गोरे, शैलेश गोरे, धीरज केळकर, संकेत गोरे, शुभम गोरे, धिरज बिरदवडे, सुरज गोरे, हर्षल जाधव, विजयकुमार तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे कमलाकर डिंबळे व त्यांच्या टीमने सहकार्य केले.
--------------------------------------------------------
फोटो २० चाकण रक्तदात्यांची सेंच्युरी
फोटो - चाकण येथील रक्तदान शिबिरातील विविध फोटो;