पुणे : एफटीआयआय असो आणि कोलकात्याची सत्यजित रे चित्रपट संस्था असो या संस्थांमध्ये कलात्मक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्यांना दोन स्वतंत्र समाईक परीक्षा द्याव्या लागतात. यात वेळेचा आणि पैशाचा अपव्यय अधिक होत असल्याने दोन्ही संस्थांची एकत्रितपणे समाईक प्रवेश घेता आली तर..? असा एक विषय समोर आला आहे. याप्रकारे परीक्षा घेण्यासंदर्भातही बैठक घेण्यात आली; मात्र तांत्रिक अडचण आणि पुरेशा तयारीचा अभाव यांमुळे हा निर्णय तूर्तास तरी लांबणीवर टाकण्यात आला आहे. कदाचित पुढच्या वर्षी ही परीक्षा एकत्रितपणे घेतली जाऊ शकते. एफटीआयआय व सत्यजिीा रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अखत्यारीत येतात. चित्रपट केलेचे शिक्षण देणाऱ्या दोनच केंद्रीय संस्था आहेत. त्या एकाच खात्यांतर्गत येत असल्या तरी त्यांच्यामध्ये सहकार्य नाही.
सीईटीचा निर्णय लांबणीवर
By admin | Published: January 14, 2017 3:26 AM