बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांचा छापा, रसायनासह गावठी दारू व साहित्य उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:55 PM2018-01-13T12:55:38+5:302018-01-13T12:59:39+5:30
गोनवडी (ता. खेड) गावांच्या हद्दीत बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा टाकून, हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरत असलेले रसायन, गावठी दारू व इतर साहित्य उद्ध्वस्त करून काही साहित्य जप्त करण्यात आले.
आंबेठाण : गोनवडी (ता. खेड) गावांच्या हद्दीत बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा टाकून, हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरत असलेले रसायन, गावठी दारू व इतर साहित्य उद्ध्वस्त करून काही साहित्य जप्त करण्यात आले.
गोनवडी गावच्या हद्दीतील ओढ्याच्या पत्रालगत बेकायदा हातभट्टीची दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (ता. १२) हा छापा टाकला. काळूराम जीवन राजपूत हा हातभट्टीची दारूचे साहित्य बॅरलमध्ये टाकून, रसायन हलवण्याचे काम करत होता, त्याला पोलिसांची चाहूल लागताच, तो ओढ्याच्या कडेच्या झाडीतून पळून जात असताना, पोलिसांनी त्याला ओळखले व आवाज देऊन थांबण्याचा इशारा दिला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला
पोलिसांना या छाप्यात मानवी जीवितास घातक ठरेल असे रसायन टाकून गुंगी येणारी विषारी हातभट्टीची दारू बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जागेवरच फोडले. १ हजार रुपये किमतीचे लोखंडी बॅरल, २०० लिटर कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.