स्टार स्पोर्ट्स अकादमीला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:25+5:302021-03-27T04:11:25+5:30
पुणे : प्रतीक साळुंखे, रुपेश ठाकूर यांच्या फलंदाजीनंतर शुभम चव्हाणच्या गोलंदाजीच्या जोरावर स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीने सहारा क्रिकेट अकादमीवर ...
पुणे : प्रतीक साळुंखे, रुपेश ठाकूर यांच्या फलंदाजीनंतर शुभम चव्हाणच्या गोलंदाजीच्या जोरावर स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमीने सहारा क्रिकेट अकादमीवर मात करत चौदा वर्र्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
स्टार स्पोर्ट्स अकादमीने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकांत नऊ बाद १७३ धावा केल्या. सहारा अकादमीला १७.३ षटकांत ३७ धावांवर रोखून स्टार स्पोर्टस अकादमीने विजय मिळवला. स्टार स्पोर्टसकडून प्रतिक साळुंखे (३६), रुपेश ठाकूर (३०), आर्यन थोरे (नाबाद १८) यांनी संघाला १७३ पर्यंत नेले. सहारा अकादमीकडून रुद्राक्ष गायकवाडने तीन तर पार्थ बैंग व श्री जाधव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सहारा क्रिकेट अकादमीला १७३ धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांच्याकडून श्री जाधव याने सर्वाधिक ९ धावा केल्या. स्टार स्पोर्टसकडून शुभम चव्हाण याने तीन, सुयश मोरेने दोन तर राज मिश्रा, शुभम सरोज व प्रतिक साळुंखे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शुभम चव्हाणला सामनावीर किताब देण्यात आला. संस्कार चव्हाण (१२८ धावा) याला सर्वोत्कृष्ट फलंदाज तर श्री जाधव (१२ बळी) याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले. राज मिश्रा (१७१ धावा, ५ बळी) याला मालिकावीर किताब देण्यात आला.
फोटो : शुभम चव्हाण, संस्कार चव्हाण, श्री जाधव, राज मिश्रा