कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:24+5:302021-01-10T04:09:24+5:30
पुणे : आग्नेय अरबी समुद्र ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मेघगर्जनेसह पाऊस ...
पुणे : आग्नेय अरबी समुद्र ते वायव्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मेघगर्जनेसह पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेले ३ दिवस राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात अकोले ४५, पुणे ३३.२, लोहगाव २९.६, पाषाण२४.२, महाबळेश्वर २७, लांजा येथे १ मिमी पावसाची नोंद झाली होती.
ढगाळ हवामान व पाऊस यामुळे राज्यातील किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
१० जानेवारी रोजी पालघर, ठाणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.