Pune: लोणीकंद आणि हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:27 PM2023-06-26T16:27:59+5:302023-06-26T16:28:18+5:30
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील..
पुणे : लोणीकंद वाहतूक विभागाच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर वाघोलीमध्ये वाघेश्वर चौक ते लाईफ लाईन रुग्णालय दरम्यान दोन्ही बाजूस नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे त्याचबरोबर हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत हडपसर उड्डाणपुल ते (सह्याद्री रुग्णालय) भोसले गार्डन कमान टपाल कचेरीच्या शेजारी रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे १५० ते २०० मीटर पर्यंत पी-१ पी-२ करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ९ जुलै पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.