शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
3
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
4
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
5
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
6
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
7
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
8
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
9
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
10
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
12
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
13
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
14
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
15
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
18
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
19
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
20
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 8:25 PM

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला अाहे.

पुणे : दिवसभरात कधी कडक उन, तर कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा, यासगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर पडणे अशा लहरी वातावरणाने मात्र लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंग्यु आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरुन थंड हवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हात -पायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे. 

    सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतुंचा अनुभव आता  एकाच दिवशी मिळत आहे. मात्र याचा परिणाम ज्येष्ठांसोंबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांची डोकेदुखी आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरुन लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम याविषयी बालरोग व शिशुतज्ञ डॉ.सचिन आठमुठे यांनी सांगितले, बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप,खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंग्युची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर वय वर्षे एक ते पाच मधील मुलांना  ‘‘हँन्ड,फुट अँन्ड माऊथ डिसीज’’ ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.    

    गेल्या काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलुन गेले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी  थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे. रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा जाणवतो, त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हद्यविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हद्यविकाराच्या लोकांना याची लागण लगेच होते. वय वर्षे 60 च्या पुढील आणि 15 वर्षाखालील मुलांमध्ये श्वासोश्वासाच्या आणि हद्यविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करुन घेणे आणि कुठल्याही प्रकारच्या सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे याची काळजी त्यांनी घ्यावी. असे हद्यरोगतज्ञ डॉ.हेमंत कोकणे सांगतात. 

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांना सायनसने हैराण केले आहे. तर लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढु लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पु होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारात वाढ झाली आहे.

- डॉ. समीर जोशी (कान, नाक, घसा तज्ञ) 

* काय करावे?- लहरी हवामानाचा सामना करताना विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना सातत्याने पाणी उकळुन द्यावे.- ज्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजाराची लागण झालेली आहे त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे.- बालदम्याचे जे रुग्ण आहेत त्यांना वेळेवर वाफ देणे, त्यांच्या श्वासोश्वासात कुठल्याही प्रकारचा धोका वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

- अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेवून स्वच्छतेला मह्त्व द्यावे लागणार आहे.  

- दिवाळी म्हटलं की घरोघरी गोड धोड पदार्थांची रेलचेल असते. काहींना त्या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरु शकते.   

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स