पुणे : कैद्यांनाही अाराेग्याचा सुविधा मिळाव्यात या हेतूने येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ही अाराेग्य तपासणी करण्यात अाली. या तपसणीचा शुभारंभ पुणे जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधिश श्रीराम माेडक यांच्या उपस्थित करण्यात अाला. यावेळी राज्याचे धर्मादाय अायुक्त शिवकुमार डिगे, तुरुंग अधिक्षक यु.टी पवार अादी उपस्थित हाेते.
राज्यभरातील कारागृहांमध्ये कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात येत असून अात्तापर्यंत 12 हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली अाहे. यावेळी बाेलताना माेडक म्हणाले, कैदी हा देखील समाजाचा अविभाज्य घटक अाहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच त्यांना देखील चांगल्या अाराेग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. धर्मादाय कार्यालयाच्या वतीने कैद्यांच्या अाराेग्य तपासणीची माेहीम राज्यभर राबविली असून, अाजपर्यंत बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली अाहे ही काैतुकास्पद बाब अाहे.
डिगे म्हणाले, तुरुंगातील कैद्यांना अनेक अाजार असू शकतात. त्याबाबतची माहिती अज्ञानामुळे ते सांगत नाहीत. त्यामुळे भविष्यात माेठ्या समस्यांना त्यांना सामाेरे जावू शकते. म्हणून कैद्यांची नियमित अाराेग्य तपासणी झल्यास त्यांना एखादा अाजार असल्यास ताे प्राथमिक अवस्थेत बरा हाेवू शकताे. येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्याची सूचना माेडक यांनी केली हाेती. ही सूचना चांगली असल्याने राज्यातील सर्वच तुरुंगात हा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात अाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या त्या जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी तुरुंगातील कैद्यांची अाराेग्य तपासणी केली अाहे. त्यामध्ये अाजपर्यंत बारा हजार कैद्यांची वैद्यकीय तपासणी केली अाहे. यापुढेही अावश्यकतेनुसार कैद्यांची तपासणी केली जाणार अाहे.