छत्रपतींचं स्मारक सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हावं : अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:06 PM2018-10-29T17:06:46+5:302018-10-29T17:09:03+5:30
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन वाद निर्माण झालेला असताना अरुणा ढेरे यांनी अापली प्रतिक्रीया दिली अाहे.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायंचं असेल तर ते सर्वसामान्यांच्या मनात व्हावं असे मत 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. अाज पुण्यात त्या पत्रकारांशी बाेलत हाेत्या.
ढेरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज काय हाेते, अाणि त्यांनी काय करुन ठेवलंय हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणे गरजेचे अाहे. सर्वसामान्य माणसांनी त्यांचा माेठेपणा अनेक अंगांनी उलगडून घेण्याची गरज अाहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायचे असेल तर ते सर्वसामान्य लाेकांच्या मनात व्हायला हवे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत त्या म्हणाल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा अाता मराठी माणसांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा मुद्दा अाता शासनाच्या निर्णयाशी जाेडला गेला अाहे. त्यामुळे मराठीचा दर्जा हा अभिजात अाहे हे अापण सिद्धही केलं अाहे. मराठी ही प्राचीन भाषा असल्याचे पुरावे अापण सरकार दरबारी सिद्ध केले अाहेत. पण त्यावर माेहाेर उमटवणं अापल्या हातात नाही. त्यामुळे वाट पाहण्यापलीकडे अापल्या हातात काही नाही.
यवतमाळ येथे हाेणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड करण्यात अाली अाहे. यंदा पहिल्यांदाच निवडणूक न घेता सर्वांच्या संमतीने ढेरे यांची बिनविराेध निवड करण्यात अाली अाहे.