फेसबुकवर मैत्री साधत जनहित मानवाधिकार या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असे सांगून सामाजिक कार्यासाठी ओळख पत्र व नियुक्ती पत्र देतो, असे त्यासाठी तालुक्यातील महिला व काही पुरुषांना प्रत्येकी ५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे अशा आशयाची तक्रार उदापूर येथील एका महिलेने केली आहे. ओतूर पोलिसांनी ही तक्रार दाखल करून फसवणूक करणारे सम्राट पारखे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले.
फसवणूक झालेल्या महिलेने ओतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटले आहे की, सम्राट पारखे यांनी फेसबुकवर मैत्री साधली व तो जनहित मानवाधिकार या राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तुम्हाला सामाजिक कार्याची आवड आहे. तुम्ही या संघटनेत सहभागी व्हा तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरील एक मोठे पद देतो व ओळख पत्रही देतो. पण त्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील. तक्रारदार महिलेने त्यांना पाच हजार रुपये दिले. बरेच दिवस झाले तेव्हा फोन करून ओळख पत्र व नियुक्ती पत्रासंबंधी विचारले असता अश्लील भाषेत शिवराळ भाषेत दमदाटी करीत आहे.