वस्तू खरेदी करताना जीएसटी क्रमांक तपासावा : शरद कसरेकर; जुन्नरला ग्राहक जनजागरण सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:33 PM2018-01-04T13:33:08+5:302018-01-04T13:36:15+5:30

ग्राहकाने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या खरेदी केलेल्या मालाच्या पावतीवरील जीएसटी क्रमांक तपासून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद कसरेकर यांनी जुन्नर येथे केले.

Check GST number when purchasing goods: Sharad Kasarekar; Customer awareness Week in Junnar | वस्तू खरेदी करताना जीएसटी क्रमांक तपासावा : शरद कसरेकर; जुन्नरला ग्राहक जनजागरण सप्ताह

वस्तू खरेदी करताना जीएसटी क्रमांक तपासावा : शरद कसरेकर; जुन्नरला ग्राहक जनजागरण सप्ताह

Next
ठळक मुद्देजुन्नर येथील तहसिल कार्यालयात झाली ग्राहक जागरण सप्ताहाची सांगता ग्राहकाने कोणताही माल खरेदी करताना वजन तपासून घेणे गरजेचे

राजुरी : ग्राहकाने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या खरेदी केलेल्या मालाच्या पावतीवरील जीएसटी क्रमांक तपासून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद कसरेकर यांनी जुन्नर येथे केले.
ग्राहक पंचायतीच्या ग्राहक दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ग्राहक जागरण सप्ताहाची सांगता जुन्नर येथील तहसिल कार्यालयात झाली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे संघटनमंत्री बाळासाहेब औटी, नायब तहसिलदार आशा दुधे, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, रवींद्र तळपे, पुरवठा निरीक्षक सुधीर वाघमारे, मंडल अधिकारी आर. व्ही. सुपे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
कसरेकर पुढे म्हणाले, की ग्राहकाने कोणताही माल खरेदी करताना त्याचे वजन तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच आपण जी वस्तू खरेदी करत आहोत ती वस्तू योग्य आहे का हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. यावेळी औटी यांनी ग्राहक कायद्याचे महत्त्व तसेच समाजात ग्राहकाची कशा प्रमाणात लूट होत आहे, या विषयी माहिती दिली. नायब तहसिलदार आशा दुधे यांनी सातबाराच्या नोंदीबाबत माहिती दिली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख लामखडे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली अडसरे व सुनील गुंजाळ यांनी केले. आभार भाऊसाहेब वाळुंज यांनी मानले.

Web Title: Check GST number when purchasing goods: Sharad Kasarekar; Customer awareness Week in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.