पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे पूर्ण झाल्यावर शनिवारी ही यात्रा पुण्यात येणार आहे. शनिवारी संध्याकाळी हडपसरपासून सुरुवात करून शहरातला विविध भागात त्यांचा रोड शो होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. फडणवीस यांची यात्रा शहराचा मोठा भाग कव्हर करणार असून त्यानिमित्ताने अनेक इच्छुकही शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
शुक्रवार (दि. १३ सप्टेंबर)पासून महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्पाला सुरुवात झाली आहे. मागील दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील २४ जिल्ह्यातील १०६ विधानसभा मतदारसंघातून २२०८ कि. मी. प्रवास झाला आहे. महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. दुस-या टप्प्यात जालना येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस व निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाला.तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.
पुण्यात यात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे :
1)शेवाळ वाडी फाटा 2)15 चौक 3)रवीदर्शन चौक 4)हडपसर पोलीस ठाणे 5)हडपसर वेस 6)मगरपट्टा चौक 7)वैद वाडी 8)राम टेकडी 9)क्रोम चौक 10)फातिमा नगर 11)भैरोबा नाला 12)रेसकोस चौक 13)पुल गेट चौक 14)पुलगेट 15)गोळीबार चौक 16)धोबी घाट 17)सेव्हन ल्व्हज चौक 18)व्हेगा सेंटर 19)स्वारगेट 20)सारसबाग चौक 21)अदंबाग चौक 22)अभिनव चौक 23)गिरिजा चौक 24)एस पी कॉलेज चौक 25)टिळक स्मारक चौक 26)दुर्वांकुर हॉटेल चौक 27)न्यु इंग्लिश स्कूल चौक 28)अलका टॉकीज चौक 29)पुना हॉस्पिटल चौक 30)गांजवे चौक 31)भारत पेट्रोल पंप नवी पेठ चौक 32)सेनादत्त पोलीस चौकी चौक 33)बाल शिवाजी दत्तवाडी चौक 34)डि पी रोड म्हात्रे पुल चौक 35)एरंडवणा चौक 36)निसर्ग हॉटेल चौक 37)नळ स्टॉप चौक 38)गरवारे कॉलेज चौक 39)खंडोजी बाबा चौक डेक्कन 40)गुडलक चौक 41)फर्ग्युसन कॉलेज चौक 42)तुकाराम पादुका चौक 43)ज्ञानेश्वर पादुका चौक 44)हॉटेल ललित महल चौक 45)शेतकी महाविद्यालय चौक 46)पुणे आकाशवाणी चौक 47)संचेती हॉस्पिटल चौक 48)कामगार पुतळा शिवाजी नगर कोर्ट 49)जुना बाजार चौक 50)आर टि ओ चौक 51)जहांगीर हॉस्पिटल चौक 52)रुबी हॉल चौक 53)धर्मादाय आयुक्त कार्यालय चौक 54)तारकेश्वर चौक 55)राजीव गांधी हॉस्पिटल येरवडा 56) नगर रस्ता मार्गे चंदन नगर