पुणे : कुठलाही सण असाे की विशेष दिन. तरुणाईकडून ताे साेशल मिडीयावर साजरा केला जाताे. साेशल मिडीया हे अाता सण साजरे करण्याचे एक ठिकाण झाले असून विविध पाेस्ट्स या दिवशी साेशल मिडीयावर पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या मनात अापल्या बालपणींच्या अाठवणींनी घर केलेले असते. बालपण पुन्हा यावे असे त्यांना वाटत असते. त्यामुळे बालदिनाचे अाैचित्य साधत साेशल मिडीयावर तरुणाईने अापले लहानपणीचे फाेटाे टाकत अापल्या बालपणांच्या अाठवणींना उजाळा दिला. साेशल मिडीया बालदिनमय झाला हाेता.
साेशल मिडया हे तरुणाईसाठीचे अाभासी जग निर्माण झाले अाहे. अायुष्यातील अनेक क्षण, सण हे अाता प्रत्यक्ष भेटून साजरे करण्याएेवजी साेशल मिडीयावर साजरे केले जात अाहेत. सण कुठलाही असाे त्या सणाशी साजेसे फाेटाे, व्हिडीअाे साेशल मिडीयावर टाकले जातात. सध्या स्मार्ट फाेनचा जमाना असल्याने मुलांबराेबरच पालकही स्मार्ट हाेत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे अनेक पालकांनीसुद्धा अापले बालपणीचे फाेटाे साेशल मिडीयावर टाकून अानंद साजरा केला. बालदिनाचे अाैचित्य साधत तरुणाईने लहानपणीचे फाेटाे पाेस्ट केले. त्यासाेबत त्या फाेटाेच्या अाठवणी तसेच ताे फाेटाे काढताना अालेली मजाही लिहीली हाेती. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम या सगळीकडे दिवसभर फाेटाे पाेस्ट केले जात हाेते. अनेकांनी बालपण पुन्हा यावे अशी इच्छाही व्यक्त केली.
याबाबत अनुजा मुळे म्हणते, सध्या अनेक गाेष्टी या साेशल मिडीयावर साजऱ्या केल्या जातात. माझी ताई सध्या अमेरिकेत असल्याने बालदिनाचे अाैचित्य साधत मी तिच्यासाेबतचा माझा फाेटाे साेशल मिडीयावर पाेस्ट केला अाहे. या फाेटाेच्या माध्यमातून बालपणीच्या अनेक अाठवणींना उजाळा मिळाला. काही काळ त्या अाठवणींमध्ये हरवून जायला झालं. त्याचबराेबर अनेक मित्र मैत्रिणींचे बालपणीचे फाेटाे देखील बालदिनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.