चिमुरड्यांचाही मदतीचा हात

By admin | Published: September 26, 2015 02:38 AM2015-09-26T02:38:20+5:302015-09-26T02:38:20+5:30

पावसाने ओढ दिल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला व दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी काही चिमुकल्यांनी पुढे येऊन

Chimuradiano help hand | चिमुरड्यांचाही मदतीचा हात

चिमुरड्यांचाही मदतीचा हात

Next

बारामती : पावसाने ओढ दिल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला व दुष्काळग्रस्त भागाला मदत करण्यासाठी काही चिमुकल्यांनी पुढे येऊन आपलाही मदतीचा हात दिला आहे. मुलांनी एकत्रित मिळून साठवलेले आणि आजोबांनी वाढदिवसासाठी दिलेले पैसे साठवून या मुलांनी जमवलेली रक्कम दुष्काळग्रस्त भागासाठी दिली आहे.
पावासाने पाठ फिरवल्याने सर्वत्रच दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. यातील काहींनी दुष्काळी जनतेविषयी केवळ कोरडी सहानुभूती न दाखवता आपापल्या क्षमतेनुसार मदतीचा हातही पुढे केला. समाजातील सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू असताना बारामती येथील चिमुरड्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी आजोबांकडून मिळालेले दहा हजार रुपये दुष्काळ निधीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्र्त केले व आपल्या सामाजिक जाणिवेचा वस्तुपाठच सर्वांसमोर ठेवला.
बारामती येथील अनंता पंढरीनाथ रोटे यांनी त्यांच्या शुभम छगन गावडे, करण छगन गावडे, ऋतुजा रामचंद्र गाढवे, ऋषभ रामचंद्र गाढवे, दिव्या रोहिदास माळवे, प्रणव रोहिदास माळवे, ओम नितीन गावडे व आर्या नितीन गावडे या नातवंडांना वाढदिवसानिमित्त १० हजार रुपये भेट स्वरूपात दिले होते. या सर्व नातवंडांनी मिळालेली रक्कम वाढदिवसासाठी खर्च न करता दुष्काळ निधीसाठी प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात सुपूर्त केली. या वेळी जाधव यांनीदेखील या चिमुरड्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Web Title: Chimuradiano help hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.