'राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी किंवा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 11:04 AM2020-02-06T11:04:01+5:302020-02-06T11:18:01+5:30
'हे मंदिर रामाचं नाही तर राष्ट्राचे प्रतीक ठरावे ही अपेक्षा आहे'
पुणे : अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मुहूर्त रामनवमी व अक्षय्यतृतीया या दोन्हीपैकी एक दिवस निवडावा अशी अपेक्षा स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली. 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टवर स्वामी गोविंदगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, आज सर्वात आधी आठवण होत आहे ती म्हणजे अशोक सिंघल यांची. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. काही लोक न्यायालयाच्या निर्णयानंतरही भडकावू भाषणे करत होते. परंतू त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भारताचे नागरिक राम नामाचा जप करत होते.
आजचा क्षण महत्वाचा आहे. आता भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये माझा खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न असणार आहे. यात कोणताही जय पराजय असा भाग नाही, तर अनेक पिढ्यांचे स्वप्न असलेले राम मंदिर पूर्ण होणार आहे. याचबरोबर, राष्ट्र उभारणी आणि अजय देश उभारण्याचा संकल्प आहे, असे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.
याचबरोबर, रामाने मानवतेचा संदेश दिला आहे. हे मंदिर रामाचं नाही तर राष्ट्राचे प्रतीक ठरावे ही अपेक्षा आहे. विश्व हिंदू परिषदेच्या प्रयत्नाची जाणीव आहे. वीस वर्षांपासून पाषाण उभारणीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. साधारण दोन वर्षात काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 97 टक्के लोक आनंदाने करत असतात. काही लोक भडकावून एखादा विरोधी स्वर लावला तर ते महत्वाचे ठरत नाही. अजून एक - दोन दिवसात आम्हाला निमंत्रण येईल, दहा लोकांची नियुक्ती झाली असून आम्ही पाच नियुक्ती करणार आहोत. माझ्या निवडीबद्दल सरकारचे आभार मानतो, असेही स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांचा मारेकरी सापडला; मुंबईतून अटक
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले
महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण
कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार