पुणे : पुणे तिथे काय उने असे म्हंटले जाते. सगळ्या गाेष्टींमध्ये पुणेकर नेहमीच अाघाडीवर असतात. तसेच अाता वाहतुकीचे नियम माेडण्यातही पुणेकर अाघाडीवर असल्याचे चित्र अाहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागातील मुंकदराव अांबेडकर चाैकात तर वाहतूक पाेलीसांसमाेरच नियम माेडण्यात येत असून पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने या चाैकात वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र अाहे. पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा पुण्यातील वाहनांची संख्या अधिक झाली अाहे. त्यात दरराेज शेकडाे नव्या वाहनांची भर पडत अाहे. सकाळच्या तसेच संध्याकाळच्या वेळी शहरातील विविध भागात माेठी वाहतूक काेंडी पाहायला मिळते. वाहतूक पाेलीसांकडून वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. परंतु तरीही वाहतूकीचे नियम माेठ्याप्रमाणावर ताेडले जात अाहेेत. विश्रांतवाडीतील मुख्य चाैकात तर नेहमीच नियम सर्रास ताेडले जातात. या ठिकाणचे सिग्नल हे फक्त शाेभेसाठी अाहेत की काय असाच प्रश्न अाता निर्माण हाेत अाहे. त्यातही वाहतूक पाेलीसांनी या ठिकाणची वाहतूक सुरळीत करणे तसेच वाहनचालकांना शिस्त लावणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडूनही नियम माेडणाऱ्यांकडे कानाडाेळा केला जात असल्याने वाहनचालकांना नियम माेडण्यात कुठलिही चूक असल्याचे वाटत नाही. या चाैकात केव्हाही पाहिलं तरी वाहनचालक झ्रेब्रा क्राॅसिंगच्या पुढेच थांबलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता अाेलांडणे अवघड जाते. त्यातही सिग्नल माेडण्याचे प्रमाणही याठिकाणी माेठे अाहे.
पुण्यातील या चाैकात पाेलीसांसमाेरच वाजवले जातात वाहतुकीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 4:18 PM
पुण्यातील विश्रांतवाडी चाैकात वाहनचालकांकडून सर्रास नियम माेडले जात असताना वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीची समस्या जटील झाली अाहे.
ठळक मुद्देवाहतूकीला नाही शिस्तनियम माेडले जात असताना पाेलीस घेतात बघ्याची भूमिका