रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:27+5:302021-01-13T04:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रक्तदान करणे हे एक मोठे कार्य आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रक्तदान करणे हे एक मोठे कार्य आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.
कोंढवा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते झाले. आमदार चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, कारी मोहम्मद इदरीस,माजी स्थायी समिती सदस्य रसिद शेख, अलाहद इब्राहिम भाई, उस्मान तांबोळी, नदीम मुजावर, नगरसेवक गफूर पठाण, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे उपस्थित होते.
सत्तार म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे.
माजी आमदार महादेव बाबर, अलाहद इमब्राहिम भाई यांनी मनोगत व्यक्त केले. कारी मोहम्मद इदरीस यांनी प्रास्ताविक, तर सोयब अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रक्तदाते, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.