शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

शहरावर नशाखोरांचा अंमल; पाऊण कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:25 AM

गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे : गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.गेल्या आठवड्यात अमली पदार्थविरोधी पथकाने ६७ ग्रॅम ब्राऊनशुगर जप्त केले. त्याची किंमतदोन लाख १ हजारइतकी आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत गांजा आणित्यापासून तयार केलेल्या तरंग गोळ््या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मेफेड्रोन हा मादक पदार्थदेखील येथे उपलब्ध होत आहे. नशेबाजांमध्ये चॅवमॅव या नावाने मेफेड्रोन अथवा एमडी हे अमली पदार्थ प्रसिद्ध आहेत. शहरात वर्षभरात २२७ किलोंहून अधिक विविध प्रकारचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत ७७ लाख ६६ हजार ३९० इतकी भरते.पूर्वी शहरात अमली पदार्थ विक्री करणाºयांचे ठराविक ठिकाण असे. मात्र पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते सतत आपला ठिकाणा बदलत असतात. त्यांच्याकडे येणारा संबंधित ग्राहकदेखील कोणाच्या तरी शिफारशीवरूनच आलेला असतो. त्या ग्राहकाला ठराविक ठिकाणी बोलावून घेऊन अवघ्या काही सेकंदात त्याच्या हातात अमली पदार्थाची पुडी देऊन ते पसार होतात.- ब्राऊनशुगर विक्रीमध्ये नायजेरियन तरुणांचा मोठा सहभाग असतो. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी नायजेरियन सापडल्यास, न्यायालयात दोषारोपपत्र सादर होईपर्यंत व शिक्षा होईपर्यंत त्यांना येथेच राहावे लागते. या काही महिन्यांच्या कालावधीत ते पुन्हा अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१७ पर्यंतची कारवाईअमली पदार्थ केसेस वजन किंमत आरोपीकोकेन २ १२.५७ ग्रॅ. १,२५,००० २गांजा, गांजामिश्रित ३६ २१६ किं. ३२,७९,९७० ३९तरंग गोळ््याब्राऊनशुगर-हेरॉईन १० ३६५.७८० ग्रॅ. १६,९९,१८० १३अफू ४ ९.४४८ कि. १६,८८,४७० ४चरस १ १.२२० कि. २,५०,००० २मेफेड्रोन, एमडी, ३ १४२ ग्रॅ. ७,२३,६०० ५चॅवमॅवएकूण ५६ - ७७,६६,४९० ६५

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थ