पुणे : अकारण अथवा आवश्यकता नसतानाही वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नचे दुष्परिणाम ग्राफिटी... संवाद... फलक आणि पत्रकांमार्फत वाहनचालकांपर्यंत बुधवारी पोचविण्यात आले. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलीस शाखेच्या माघ्यमातून ‘नो हॉर्न’चा जागर शहरभर केला.आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी पुकारलेल्या ‘नो हॉर्न’ दिनाला पुणेकरांना भरघोस प्रतिसाद दिला. हास्य क्लब, रोटरी आणि लायन्स क्लबचे सदस्यही या मोहिमेत सहभागी झाले होते. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांनही नो हॉर्नची शपथ यावेळी घेतली. पुणे विद्यापीठ, अलका चौक यांसह विविध पेट्रोल पंप आणि शाळा, महाविद्यालयात जाऊन हॉर्नमुळे होणाºया दुष्परिणामांची माहिती देण्यात आली.पुणे विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यावेळी उपस्थित होते. हॉर्न नॉट ओके प्लीज आणि नो हॉकिंगचे फलक यावेळी लावण्यात आले. तसेच तब्बल ७० ते ८० मीटर लांब असलेल्या कागदावर ग्राफिटी करण्यात आली. उपस्थितांनी नो हॉर्न आणि दुष्परिणामांचे संदेश त्यावर चितारले.प्रादेशिक परिवहन अधिकारी आजरी म्हणाले, की शहरासह बारामती आणि पिंपरी-चिंचवडलाही ‘नो हॉर्न’चे कार्यक्रम घेण्यात आले. आरटीओच्या पोलीस निरीक्षकांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना नो हॉर्नची प्रतिज्ञा दिली. नागरिकांनीदेखील यानिमित्ताने हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला पाहिजे.>विद्यार्थ्यांनी केले वाहनचालकांना आवाहनलोकमान्य टिळक चौकात (अलका सिनेमागृह) विद्यार्थ्यांनी साखळी करीत वाहनांमुळे होणाºया ध्वनिप्रदूषणाची माहिती दिली. नको हॉर्न हवी शांतता असा फलक विद्यार्थ्यांनी घेतला होता. विनाकरण हॉर्न वाजवू नका, असे आवाहन वाहनचालकांना करण्यात येत होते. यात सहभागी झालेल्या हास्य क्लबच्या सदस्यांनी विविध पेट्रोल पंपावर पत्रके वाटवून जागृती केली. याशिवाय विविध रिक्षांवर ‘एमएच बारा हॉर्नचे वाजवा बारा’ अशी घोषणा चितारलेले पत्रक लावण्यात आले होते.
शहरात झाला ‘नो हॉर्न’चा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:15 AM