नाण्यांमध्ये इतिहास, संस्कृतीची गुंफण : प्रशांत कुलकर्णी; ‘कॉईनेक्स पुणे २०१७’ राष्ट्रीय प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:28 PM2017-12-19T12:28:26+5:302017-12-19T12:37:25+5:30

नाण्यांमध्ये इतिहास आणि संस्कृतीचे गुंफण आढळून येत आहे, असे मत ज्येष्ठ नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि संग्राहक प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

'coinex Pune 2017' National exibition organize in karve road, pune | नाण्यांमध्ये इतिहास, संस्कृतीची गुंफण : प्रशांत कुलकर्णी; ‘कॉईनेक्स पुणे २०१७’ राष्ट्रीय प्रदर्शन

नाण्यांमध्ये इतिहास, संस्कृतीची गुंफण : प्रशांत कुलकर्णी; ‘कॉईनेक्स पुणे २०१७’ राष्ट्रीय प्रदर्शन

Next
ठळक मुद्देगेल्या २१ वर्षांपासून आयोजित करण्यात येते नाण्यांचे प्रदर्शननाणे संग्राहक अरविंद आठवले आणि रण विजय सिंग यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : लिखित इतिहास किंवा त्या काळातील प्रचलित नाणेच तत्कालीन संस्कृती आणि इतिहासाचे खरे चित्र उभे करू शकते. नाणे संग्राहकांनी नाणे संवर्धनाच्या माध्यमातून इतिहास आणि त्या काळातील संस्कृतीचेच संवर्धन केले आहे. कारण नाण्यांमध्ये इतिहास आणि संस्कृतीचे गुंफण आढळून येत आहे, असे मत ज्येष्ठ नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि संग्राहक प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी आॅफ रेअर आयटम्सतर्फे  दरवर्षीप्रमाणे कॉईनेक्स पुणे २०१७ या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन सोनल हॉल कर्वे रोड येथे करण्यात आले आहे. या वेळी सोसायटीचे प्रेसिडेंट नरेंद्र टोले, व्हाईस प्रेसिडेंट राजेंद्र शहा, चेअरमन रवींद्र दोशी, सेक्रेटरी शरद बोरा, खजिनदार आणि प्रदर्शनाचे समन्वयक नितीन मेहता आणि बस्ती सोळंकी उपस्थित होते. 
इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी आॅफ रेअर आयटम्सतर्फे गेल्या २१ वर्षांपासून नाण्यांचे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यंदा या प्रदर्शनाचे २२वे वर्ष आहे. या वेळी नाणे संग्रह या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील नाणे संग्राहक अरविंद आठवले आणि लखनो येथील नाणे संग्राहक रण विजय सिंग यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी भारतातील नाणे तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असलेल्या कॉईनेक्स पुणे २०१७ या प्रदर्शनावर आधारित एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या वेळी औरंगाबादचे आशुतोष पाटीललिखित ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 
कुलकर्णी म्हणाले, काही नाण्यांवर वडिलांऐवजी आईची नावे कोरलेली आहेत. यावरून त्या काळात स्त्रियांना दिला जाणारा मान आणि स्त्रीप्रधान संस्कृतीवर प्रकाश टाकला जातो. हा स्त्रीप्रधान समाज आणि समाजव्यवस्था नाण्यांच्या रूपाने जतन केला गेला आहे. 
गार्गी, मैत्रयी, नागणिका अशी अनेक सशक्त स्त्रीप्रधान संस्कृतीची उदाहरणे आपणास नाण्यांच्या माध्यमातून दिसून येतात. पूर्वी नाणे संग्राहकाला कुटुंबापासून ते समाजापर्यंत सर्वच जण वेड्यात काढायचे. अगदी नाणे संग्राहकाच्या घरी सोयरीक करायलादेखील समाज तयार नसायचा. नाणे संग्राहकाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जायचे. परंतु आता बऱ्याच नाणे संग्राहकांना संस्थांमार्फत एक व्यसापीठ प्राप्त झाले आहे. तसेच जीएसटी अ‍ॅक्टमध्येदेखील याचा समावेश झाल्याने त्याला इंडस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या छंदाला दर्जा प्राप्त झाला आहे. 
नाणे संग्राहकांना सन्मान आणि दर्जा प्राप्त करून देण्यात आॅक्शन्स हाऊसेसचादेखील सिंहाचा वाटा आहे. आता नाणे संग्रह हा गुंतवणुकीचा देखील एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. सोसायटीचे चेअरमन रवींद्र दोशी यांनी प्रास्ताविक केले. बस्ती सोळंकी यांनी सूत्रसंचलन केले. नितीन मेहता यांनी आभार मानले. 

Web Title: 'coinex Pune 2017' National exibition organize in karve road, pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे