जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:11 AM2018-10-30T02:11:27+5:302018-10-30T02:13:19+5:30

जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत.

Collector will inspect the drought situation | जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

Next

पुणे : जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्याचा गावनिहाय अहवाल घेतला जात आहे. परंतु, जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत.

मराठवाड्यासह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. तसेच, राज्यात परतीचा पाऊसच पडला नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामांतील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यातील मावळ, मुळशी व खेड हे तालुके सोडून इतर दहा तालुक्यांमधील स्थिती गंभीर आहे. इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला असला, तरी पावसात सातत्य नसल्याने तालुक्यातील भातपीक वाया गेले आहे.

दुष्काळी गावांच्या यादीमध्ये आपल्या गावाचाही समावेश केला जाणार का? याबाबत काही शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील संघटना व लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाºयांना दुष्काळी स्थितीची माहिती दिली जात आहे. सोमवारी जुन्नर भागातील नागरिकांनी दुष्काळी स्थितीचे छायाचित्र जिल्हाधिकाºयांना सुपूर्त केले. तसेच, धरण परिसर सोडून इतर भागातील पिकांची पहाणी करून जुन्नरमधील गावांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये सभावेश करावा, या मागणीचे निवेदन दिले.
नवल किशोर राम म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळी स्थितीची माहिती संकलित केली जात असून प्रत्येक तालुक्याचा गावनिहाय आढावा घेतला जात आहे. तालुक्यात पडलेला पाऊस आणि पिकांची स्थिती यांचा तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल जमा केला जात आहेत. तसेच. नोव्हेंबरमध्ये दुष्काळाची पाहणी करणार आहे.

दुष्काळावर जिल्हाधिकाºयांशी चर्चा
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन जिल्हातील दुष्काळी स्थितीवर चर्चा केली. प्रत्येक तालुक्यातील पावसाची स्थिती तपासावी. तसेच, टँकरची मागणी असणाºया भागात तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी पवार यांनी केली.

Web Title: Collector will inspect the drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.