दिलासादायक! पुण्यात शुक्रवारी एकाच दिवसात ५१ रुग्ण बरे होऊन गेले घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:34 PM2020-05-02T18:34:46+5:302020-05-02T18:35:27+5:30

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे आश्वासक चित्र निर्माण

Comfortable! 51 patients were discharg in a single day on Friday In Pune | दिलासादायक! पुण्यात शुक्रवारी एकाच दिवसात ५१ रुग्ण बरे होऊन गेले घरी

दिलासादायक! पुण्यात शुक्रवारी एकाच दिवसात ५१ रुग्ण बरे होऊन गेले घरी

Next
ठळक मुद्देआतापर्यंतचा सर्वाधिक आकडा : गुरुवारीही ४४ जणांना सोडले होते घरी

पुणे : एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे दिलासादायक आणि सकारात्मक घटना घडते आहे. कोरोनामधून ठणठणीत बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. सलग दोन दिवस हा आकडा ४५ च्या वर राहिला असून दोन दिवसात तब्बल ९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३२५ रुग्ण बरे झाले असून एकूण ९२ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे आश्वासक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
कोरोनाचा शहरातील प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या आठवड्याभरातील आकडेवारीवरुन दिसत आहे. गेल्या आठवड्यात साडेपाचशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये उपचारांची सुविधा होती. परंतू, पालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिका-यांच्या प्रयत्नातून अन्य खासगी रुग्णालयांमध्येही उपचारांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासोबतच ससून रुग्णालयातही रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
गेल्या काही दिवसात बरे होऊन घरी जाणा-यांची संख्या दिवसाला तीन-चार अशी होती. परंतू मागील आठवड्यात हा आकडा वाढून दहा ते बारावर आला होता. बुधवारी एकाच दिवसात २७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर गुरुवारी हा आकडा वाढून ४४ वर गेला. गुरुवारी त्यामध्ये आणखी वाढ होत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५१ वर गेला. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने दिलासा मिळाला आहे. महापालिका कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
======
महापालिका लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच वैद्यकीय उपचार, स्वच्छता, जनजागृती, सुरक्षा साधने पुरविणे आदी पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र आजारातून पुर्णपणे बरे झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. या चार दिवसात बरे झालेल्यांची संख्या १३३ झाली असून ही सकारात्मक बाब आहे. यामुळे नागरिकांचा उपचारांवरील विश्वास नक्कीच वाढेल. आतापर्यंत १६११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले असले तरी प्रत्यक्षात अ?ॅक्टिव्ह केसेस ११५० आहेत.
- रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका

Web Title: Comfortable! 51 patients were discharg in a single day on Friday In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.