शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

विद्यापीठ कायदा सुधार समितीच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:09 AM

पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे विद्यापीठ कायद्यातील सुधारणेसाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक ...

पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे विद्यापीठ कायद्यातील सुधारणेसाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कायद्यात कोणते बदल करावेत, ऑनलाइन परीक्षा संदर्भात कायद्यात कोणती तरतूद करावी, इतर विद्यापीठांमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा समावेश राज्याच्या शिक्षण क्षेत्रात कसा करावा, याबाबत समितीकडून अहवाल तयार करण्याचे काम केले जात आहे, असे समितीतील सदस्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह व नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरण महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विविध विद्यापीठांच्या आजी- माजी कुलगुरूंसह कायदे अभ्यासक व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ञ प्राध्यापकांचा समावेश केला आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे या समितीचे सदस्य तर उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. विद्यापीठ कायद्यातील सुधारणांच्या दृष्टीने शिक्षक-शिक्षकेतर सेवक, विविध शैक्षणिक संघटना यांच्याकडून येत्या ४ डिसेंबरपर्यंत सूचना मागविल्या आहेत.

विद्यापीठ कायद्यात सुधारणा करताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे यांचा विचार केला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये करता यावा; या दृष्टीनेही समितीकडून चाचपणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागल्या. मात्र, विद्यापीठ कायद्यात ऑनलाइन परीक्षा संदर्भात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे विद्यापीठ कायद्यात बदल करताना ऑनलाइन परीक्षाबाबतही सविस्तर मांडणी केली जाणार आहे. शासनातर्फे स्थापन केलेल्या समिती बरोबरच सध्या उपसमित्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. येत्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात समितीचा अंतरिम अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे, असे समितीतील एका सदस्याने सांगितले.