कोरोनाचे विश्लेषण करण्यासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:18+5:302021-01-10T04:09:18+5:30
कोरोनामुळे ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनेक विद्यार्थ्यांकडे ॲंड्राईड मोबाईल नाही, इंटरनेटची सुविधा नाही. परिणामी ऑनलाइन शिक्षणाच्या ...
कोरोनामुळे ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनेक विद्यार्थ्यांकडे ॲंड्राईड मोबाईल नाही, इंटरनेटची सुविधा नाही. परिणामी ऑनलाइन शिक्षणाच्या प्रक्रियेत 10 टक्के विद्यार्थी सुध्दा सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम काय आहे ? हे सुध्दा माहिती नाही. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑनलाइन अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठाने मोजण्याइतक्या महाविद्यालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेचा निर्णय घेऊ नये,याबाबतचा प्रस्ताव अधिसभेत डॉ. मोतीराम देशमुख यांनी मांडला.त्यावर विचार करण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल,असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे विद्यापीठात विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करावे असा प्रस्ताव सदस्य संतोष ढोरे यांना मांडला.विद्यार्थ्यांच्या तक्रारी, समस्या सोडविण्यासाठी, त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम या केंद्राने करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यावर समिती नियुक्त करण्याचे आश्वासन विद्यापीठ प्रशानकडून देण्यात आले.