शिवसेनेची ध्येयधोरणे ही लोकांपर्यंत पोहचवा : चांदेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:13+5:302021-07-15T04:08:13+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर दि. १२ ते २४ जुलै या दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर दि. १२ ते २४ जुलै या दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी वेल्हे तालुक्यातील वांगणी येथील आयोजित कार्यक्रमात झाला. त्यावेळी ते बोलत होते. चांदेरे पुढे म्हणाले, ‘‘शिवसेनेने गेल्या पाच दशकांच्या वाटचालीत मराठी माणसाची अस्मिता जपत आपले राजकीय अस्तित्व वेळोवेळी दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा शिवसेना आजही जपत असून, सर्वसामान्य माणसांचे हित जपणे हाच विकासाचा खरा मंत्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवभोजन थाळीसारखे कौतुकास्पद उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविले. पक्ष संघटनेची मजबुती व कार्यकर्ता सक्षमीकरणासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजना व पक्षाची उद्दिष्टे शिवसैनिकांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवयाची असून तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसैनिकांनी पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, उपजिल्हा संघटक सचिन दगडे, तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, माजी तालुकाप्रमुख दत्ता देशमाने, दीपक दामगुडे, गणेश उफाळे, कैलास चोरघे, मधू पोळ, सचिन चोरघे, सुशांत भोसले, अंकुश चोरघे, तानाजी भिरामणे, ज्ञानेश्वर चोरघे, बाप्पू चोरघे, संतोष चोरघे, नितीन चोरघे, कृष्णा चोरघे, किशोर उफाळे, पप्पू ननावरे शिवसैनिक सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते.
वांगणी (ता. वेल्हे) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या हस्ते शिवसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली.