बेपत्ता तरुणीच्या अपहरणाची तक्रार
By admin | Published: July 27, 2016 03:55 AM2016-07-27T03:55:13+5:302016-07-27T03:55:13+5:30
एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार तिघां जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती : एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनुसार तिघां जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. बारामती शहरातील जळोची उपनगरातील सुवर्णयुग रेसिडन्सी या इमारतीमध्ये त्या राहतात. आरोपीदेखील त्याच इमारतीमध्ये रहिवासी आहेत.
आरोपी किरण अशोक माळवदकर, अशोक नामदेव माळवदकर, अक्षय अशोक माळवदकर या तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ जून २०१६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास बेपत्ता तरुणीला मैत्रिणीचा फोन आला होता. त्यानंतर अॅडमिशन घेण्यासाठी ती निघून गेली. त्यानंतर आजपर्यंत ती घरी परत आलेली नाही.
तसेच, तिघे आरोपी देखील त्यांच्या घरी आढळून आलेले नाही. त्यामुळे मुलीच्या आईने तिघांच्या विरोधात अज्ञात कारणास्तव मुलीचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद यापूर्वी तिच्या आईने १५ जून रोजी दिली आहे. त्यानंतर त्यांनी आज थेट
मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे करीत आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अटक नसल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)