पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अखेर निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रेंगाळणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, प्राध्यापकांकडून दिला जाणारा त्रास आदी विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी या समितीकडे दाद मागू शकतील.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ७९ (३) अन्वये विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन वर्ष उलटले तरी या समितीची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे या समितीचे सदस्य असणार आहेत.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याने त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकणार आहे.
विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी अखेर तक्रार निवारण समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 7:42 PM
विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : दाद मागण्याचा मार्ग खुलासेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार