कोंढवली विंझर बंधाऱ्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:42+5:302021-09-07T04:14:42+5:30
कोंढवली बंधारा खूप जुना असल्याने त्याचे आयुर्मानानुसार तो जीर्ण होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पडलेले असून अपघाताची शक्यता आहे. ...
कोंढवली बंधारा खूप जुना असल्याने त्याचे आयुर्मानानुसार तो जीर्ण होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पडलेले असून अपघाताची शक्यता आहे. कोंढवली, मालवली, लाशिरगाव आणि विंझर या गावांतील पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यावरील पाणीसाठवण यावर अवलंबून आहेत. परंतु बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने पाणी साठत नाही आणि पाणीपुरवठा योजनेतील विहिरींना पाणी नसल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या बंधाऱ्यातील पाण्यावर मालवली, लाशिरगाव, दापोडे, वांजळे, कोंडवली आदी गावांतील शेतकऱ्यांची शेती या पाण्यावर अवलंबून आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती देखील धोक्यात आलेली आहे त्यामुळे येथील नवीन बंधारा बांधून मिळावा, अशी मागणी सरपंच अजय करंजकर, संतोष रास्ते, रोहिदास करंजकर, दीपक करंजकर, संजय करंजकर आदींनी केली आहे.