मंगेश तेंडुलकर यांची परंपरा जपली , वाहतुकीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:19 AM2017-10-19T03:19:42+5:302017-10-19T03:19:57+5:30

प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने २० वर्षे नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ते प्रयत्नशील होते.

 Congregation traditions of Mangesh Tendulkar, public awareness about traffic | मंगेश तेंडुलकर यांची परंपरा जपली , वाहतुकीबाबत जनजागृती

मंगेश तेंडुलकर यांची परंपरा जपली , वाहतुकीबाबत जनजागृती

googlenewsNext

पुणे : प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने २० वर्षे नळस्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर, नात श्रावणी ढवळे, शुभंकर ढवळे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विजय कदम, सचिन दांगट, वैष्णवी दांगट, मोहन आपटे, पूजा गिरी, प्रदीप गिरी, बाबा चौकसे यांच्यासह वाहन अपघातात आपल्या मुलांना गमावणारे गुरुसिद्धय्या स्वामी, शशी स्वामी, स्नेहल स्वामी तसेच वाडिया कॉलेज जवळील अपघातात आपल्या कन्येला गमावलेल्या सुनंदा जप्तीवाले हेही सहभागी झाले होते.

१ वंदना तेंडुलकर म्हणाल्या, ‘‘बाबांना दिवाळीच्या फराळात नवीन कपडे किंवा इतर कशातही रस नव्हता. समाजातील उणीवा दूर करण्याचा ध्यास होता. अपघातांमध्ये कोणाचे ही कुटुंबीय दगावू नयेत, यावर त्यांचा भर होता. वाहतूक नियम पाळा, हा सोपा संदेश ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून देत असत.
२ केवळ दंडात्मक कारवाईतून नव्हे तर लोकप्रबोधनातून वाहतूक समस्या सुटू शकेल, असा तेंडुलकर यांचा विश्वास होता, असे गेली १३ वर्षे या उपक्रमात सहभागी होणारे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

३ कोणत्याही मोठ्या माणसाच्या निधनापश्चात त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली, असे मत नगरसेविका
मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.

Web Title:  Congregation traditions of Mangesh Tendulkar, public awareness about traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे