इंदापूर : इंधन दरवाढ, तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीच्या विरोधात सोमवारी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक पेट्रोल पंपावर वाहनचालकांना लॉलीपॉप वाटप करून निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी बोलताना स्वप्नील सावंत म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार हे व्यापारी विचाराचे सरकार आहे. संपूर्ण देश विकायला काढला असून, देशातील सर्वच शासकीय कंपन्याचे खासगीकरण चालू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या अत्यंत बिकट काळात देखील सरकार अत्यावश्यक असणाऱ्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस याकडे नफेखोरीच्या नजरेतून बघत आहे. सरकारने लावलेला भरमसाट कर कमी केला पाहिजे, अन्यथा येणाऱ्या दिवसात महागाई नवा उच्चांक करेल.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, सबके साथ विश्वासघात अशा घोषणा दिल्या. पुणे जिल्हा सरचिटणीस जाकिर काझी, तालुका कार्याध्यक्ष काका देवकर, इंदापूर शहर अध्यक्ष रमजानभाई ( चमन ) बागवान, निवास शेळके, राहुल वीर, महादेव लोंढे , शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर, रवींद्र फाळके, जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील, मिलिंद साबळे , सुफियानखान जमादार, समीर शेख आदी उपस्थित होते.
२२ इंदापूर आंदोलन
इंदापूर येथे काँग्रेसच्या वतीने लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले.