बंदोबस्तात कुंभारवळण कचरा प्रकल्प सुरू

By admin | Published: May 13, 2016 01:19 AM2016-05-13T01:19:11+5:302016-05-13T01:19:11+5:30

येथे सासवड नगरपालिकेला शासनाने दिलेल्या जागेत उभ्या केलेल्या घनकचरा प्रकल्पाला आज (दि. १२) सुरुवात झाली आहे.

Construction of Kumbharavalan garbage project in the hostel | बंदोबस्तात कुंभारवळण कचरा प्रकल्प सुरू

बंदोबस्तात कुंभारवळण कचरा प्रकल्प सुरू

Next

सासवड : कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे सासवड नगरपालिकेला शासनाने दिलेल्या जागेत उभ्या केलेल्या घनकचरा प्रकल्पाला आज (दि. १२) सुरुवात झाली आहे. मात्र या प्रकल्पाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा असलेला विरोध कायम आहे. हरित न्यायालयाच्या निर्णयानुसार कुंभारवळण येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची सुरुवात झाली. या वेळी न्यायालयाच्या सूचनेनुसार मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
या वेळी पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, सरपंच गणेश कामथे, श्रीकांत ताम्हाणे, नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, पाणी पुरवठ्याचे ज्ञानेश्वर गिरमे आदी उपस्थित होते.
उपस्थित आंदोलनकर्त्यांनी, या प्रकल्पाला असणारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध संपलेला नाही, तो कायम राहणार आहे. यापुढेही कायदेशीर मार्गाने लढा देणे सुरूच ठेवणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी असणाऱ्या संरक्षण भिंत, झाडे, विद्युत व्यवस्था आदी त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे झुरंगे यांनी सांगितले. दुर्वास यांनी, या ठिकाणी दररोज फक्त २ टन घनकचरा आणून त्यावर तत्काळ प्रक्रिया केली जाईल, परिसरातील नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, येत्या आठवडाभरात विद्युत सुविधा होणार आहे. परंतु जनरेटर असल्याने प्रक्रियेचे काम थांबणार नाही. या परिसरात १० हजार वृक्षलागवड करणार आहे तसेच संरक्षण भिंतीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण केले जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाला भेट देऊन प्रक्रिया पाहणी करावी म्हणजे त्यांचा गैरसमज दूर होईल असे सांगतले. तसेच सहकार्य करावे असे आवाहन केले. कुंभारवळणचे सरपंच गणेश कामथे, एखतपूर-मुंजवडीचे माजी सरपंच रामभाऊ झुरंगे, महादेव टिळेकर, माणिक निंबाळकर, देविदास कामथे, शरद टिळेकर व दत्ता टिळेकर या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. (वार्ताहर)

Web Title: Construction of Kumbharavalan garbage project in the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.